|Friday, November 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 29, 31 मार्चला प्राप्तिकर केंद्रे सुरूच

29, 31 मार्चला प्राप्तिकर केंद्रे सुरूच 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

प्राप्तिकरदात्यांना रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागता नये यासाठी 29 आणि 31 मार्च रोजी प्राप्तिकर कार्यालये आणि प्राप्तिकर सेवा केंद्रे सुरू राहतील असे सरकारकडून सांगण्यात आले. 29 मार्च रोजी महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे आणि 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 29 आणि 31 मार्च रोजी सरकारी सुटी जाहीर करण्यात आली होती. 2016-17 साठी प्राप्तिकर भरण्यासाठी 31 मार्च हा शेवटचा दिवस असून 2017-18 साठी  नियमित रिटर्नसाठीचा शेवटचा दिवस आहे. प्राप्तिकर रिटर्न भरणे आणि त्यासंबंधित कामे पूर्ण करण्यासाठी देशातील प्राप्तिकर विभागाची केंद्रे सुरू राहतील. 29 आणि 30 मार्च रोजी बँका बंद राहणार आहेत, तर 31 मार्च रोजी बँका सुरू राहतील. शनिवारी पूर्णवेळ शाखा सुरू ठेवण्याचा काही बँकांनी निर्णय घेतला आहे.

Related posts: