|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अंबाबाईच्या चांदीच्या रथाची स्वच्छता

अंबाबाईच्या चांदीच्या रथाची स्वच्छता 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ंजोतिबाच्या चैत्रयात्रा झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी म्हणजे 1 एप्रिलला करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव साजरा होत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने रथोत्सवाची जय्यत तयारीला वेग घेतला आहे. या तयारीचा एक भाग म्हणून मंगळवारी रथोत्सवासाठी खास तयार करुन घेतलेल्या चांदीच्या रथाची स्पीडगनच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली. अंबाबाई मंदिरातील रामाचा पार येथे प्रशांत आंबेकर, देवदास वांद्रे, देवस्थान समितीचे कर्मचारी, गुजरीतील महेश कडणे व त्यांचे सहकारी आदींनी परिश्रम घेऊन रथाची स्वच्छता केली.

   सकाळी साडे 9 वाजता रथ स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. सायंकाळी 5 वाजता स्वच्छता काम पूर्ण झाले. यानंतर गुजरीतील काही जाणकार चांदी कारागिरांकडून रथाला पॉलिश घालण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. बुधवारपर्यंत (दि. 28) पॉलिशचे काम सुरु राहणार आहे. दरम्यान, देवस्थान समितीच्या वतीने येत्या तीन दिवसात रथाला विद्युत रोषणाई केली जाणार आहेत. 1 एप्रिलला परंपरेनुसार रात्री साडे नऊ वाजता अंबाबाई मंदिराच्या रामाचा पार येथे अंबाबाई व रथाला तोफेची सलामी दिली जाईल. यानंतर महाद्वाराजवळून अंबाबाईचा रथ नगरप्रदक्षिणेसाठी प्रयाण करेल.