|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोतवालांना चतुर्थ वेतनश्रेणी लागू करावी

कोतवालांना चतुर्थ वेतनश्रेणी लागू करावी 

कोतवालांना चतुर्थ वेतनश्रेणी लागू करावी

प्रतिनिधी/ कागल

महाराष्ट्र राज्यातील कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ वेतनश्रेणी लागू करणेबाबत बरेच दिवस प्रस्ताव प्रलंबीत आहे. त्यांना तात्काळ ही वेतनश्रेणी लागू करुन योग्य न्याय द्यावा, अशी मागणी म्हाडा पुणे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

मुंबई येथे मंत्रालयात समरजितसिंह घाटगे यांनी या विषयावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. गुजरात, त्रिपुरा व तमिळनाडू या राज्यातील कोतवाल कर्मचाऱयांना 1989 पासून चतुर्थश्रेणी दर्जा दिला आहे. मात्र महाराष्ट्रात त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर  आलेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोतवाल संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेवून याबाबत निर्णय घेणेसाठी स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितनीने आपला अहवाल मुख्यमंत्री कार्यालयात पाठविलेला आहे. परंतू त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मागील कित्येक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून मागील सरकारने ही यावर निर्णय घेतलेला नाही.