|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » स्वाभिमानी फेंडेकरतर्फे पाच उमेदवार जाहीर

स्वाभिमानी फेंडेकरतर्फे पाच उमेदवार जाहीर 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा पालिकेसाठी येत्या 29 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीसाठी आमी फोंडेकर पुरस्कृत स्वाभिमानी फोंडेकर फोरमतर्फे आपल्या पॅनलमधील पहिल्या टप्प्यातील पाच उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमी फोंडेकरचे अध्यक्ष अभय केसरकर यांनी या उमेदवारांची नावे जाहीर केली.

प्रभाग 5 मधून फोरमचे मुख्य समन्वयक मनोज गावकर, प्रभाग 9 मधून ज्युलियाना गोम्स, प्रभाग 11 मधून ब्रह्मानंद नाईक, प्रभाग 14 मधून रुद्रेश पारोडकर तर प्रभाग 15 मधून मदनंत वेरेकर या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. पुढील टप्प्यात आणखी सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. फोंडय़ातील विविध समस्या व विकासाच्या मुद्यावर भर देतानाच स्वच्छ, पारदर्शन व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हा या पॅनलचा जाहीरनामा असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. शहरातील वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छ व हरित शहर हे अन्य प्रचाराचे मुद्दे असतील. प्रत्येक प्रभागातील नागरिकांची मते आजमावून हे उमेदवार जाहीर करण्यात आले असून दुसऱया टप्प्यातही जनतेच्या पाठिंबा असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल, मनोज गावकर यांनी सांगितले. गरज पडल्यास काही प्रभागामध्ये समविचारी पॅनल किंवा उमेदवारांना पाठिंबा देण्याची फोरमची तयारी असल्याचे एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले.