|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » हेतूपुरस्सर पेंद्राची निवड होत असल्यास कडक कारवाई

हेतूपुरस्सर पेंद्राची निवड होत असल्यास कडक कारवाई 

प्रतिनिधी मुंबई

विद्यार्थ्यांसाठी योग्य सोयी-सुविधा नसलेल्या ठिकाणी दहावीच्या परीक्षेसाठी हेतूपुरस्सर पेंद्राची निवड होत आहे, अशी निकषाबाहेर परीक्षा पेंद्राची निवड होत असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.

दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्याबाबत आमदार विक्रम काळे यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. दहावी-बारावी परीक्षांमध्ये कॉपी होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येते. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षक आमदारांनी याबाबत हिंमत दाखविल्यास कॉपीचा प्रश्न राहणार नाही. असे चर्चेला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले. परीक्षेला एका बाकावर दोन विद्यार्थी बसविणे चुकीचे आहे. असे झाले असल्यास याबाबत चौकशी करण्यात येईल. त्यासाठी आपापल्या मतदारसंघातील शिक्षक असला तरी चालेल. मात्र त्याला कोणीही पाठीशी न घालता त्याला सरकारसमोर आणल्यास कठोर कारवाई निश्चित होईल. परंतु, सर्वांचा पाठिंबा आवश्यक असल्याचेही तावडे यांनी सांगितले. तसेच नगर, बीड येथील अनेक केंद्रे आहेत जिथे विद्यार्थी शिकतात. एकीकडे आणि परीक्षा देतात दुसरीकडे हे थांबविणे गरजेचे आहे. एखाद्या परीक्षा केंद्रावर जर पेपर फुटला तर तो पेपर लगेच बदलता येईल का याबाबतही शिक्षण मंडळाशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य तानाजी सावंत यांनी सहभाग घेतला होता.

Related posts: