|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » राळेगणसिद्धीत ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

राळेगणसिद्धीत ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा 

ऑनलाईन टीम / राळेगणसिद्धी :

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. सरकार अण्णांच्या मागण्यासंदर्भात गांर्भीयाने विचार करत नाही. त्यामुळे राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामस्थांनी काल शासकिय कर्मचाऱयांना गावबंदी केल्यामुळे आज राळेगणसिद्धीत एकही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी आलेला नाही. राळेगणसिद्धीत मोठय़ाप्रमाणात लाकडे आणली जात आहेत. नगर-कल्याण रोडवर, जवळे, पानोली, सुपा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे. सरकार अण्णांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या आंदोलनातून ते सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

अण्णांनी आज उपोषण सोडण्याची आवश्यकता, न सोडल्यास प्रकृती आणखी खालावणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उपोषणाबाबत पुढची रणनिती ठरवण्यासाठी अण्णांनी कोअर कमिटीची महत्वाची बैठक बोलावली आहे. सरकारचे आत्तापर्यंतचे प्रस्ताव, अण्णांची ढासळत चाललेली प्रकृती या दोन्ही पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होईल. अण्णांच्या प्रकृतीबद्दल कालपासून आंदोलकांमध्ये चिंता आहे.