|Thursday, December 13, 2018
You are here: Home » leadingnews » अण्णांच्या मागण्या सरकारकडून तत्त्वतः मान्य; उपोषण  मागे

अण्णांच्या मागण्या सरकारकडून तत्त्वतः मान्य; उपोषण  मागे 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

 जनलोकपालासह अन्य मागण्यांसाठी रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी अखेर आपले उपोषण मागे घेतले. अण्णांच्या बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी हे उपोषण मागे घेतले.

 मोदींना 43 पत्रे लिहून एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे अण्णांनी म्हटले होते. शेतकऱयांसाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा, लोकपाल नियुक्त करा, यासारख्या अन्य मागण्या घेऊन अण्णा रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते. यापैकी अण्णांच्या बहुतांश मागण्या सरकारने तत्वतः मान्य केल्या आहेत. त्यामुळे अण्णांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

  ‘सरकारने आमच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून सरकार दिलेले आश्वासन लवकरात लवकरात पूर्ण करेल ही आमची अपेक्षा आहे. आम्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत सरकारला देत आहोत. सहा महिन्यांच्या आत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये, अशी आशा अण्णांनी यावेळी व्यक्त केली.

 

Related posts: