|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » नीरव मोदी आणि मेहुल चोकसीला परत आणणार : नीरमला सितारामन

नीरव मोदी आणि मेहुल चोकसीला परत आणणार : नीरमला सितारामन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंजाब नॅशनल बँकेला 12,600 कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला सरकार भारतात परत आणणार असा विश्वास संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.

‘आपल्या सिस्टीममध्ये असलेल्या कमतरता वाढू नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी पळून गेले आहे, आम्ही त्यांना परत आणू’,असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना निर्मला सितारामन यांनी सरकार सुधारणा करण्यासाठी तयार असल्याचेही सांगितले. तसेच वस्तू आणि सेवा कर सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयांपैक एक असल्याचेही त्या बोलल्या आहेत.