|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » भाजपासोबत युती केली नसती तर आणखी 15 जागा जिंकल्या असत्या : चंद्राबाबू

भाजपासोबत युती केली नसती तर आणखी 15 जागा जिंकल्या असत्या : चंद्राबाबू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशला पुरेशी मदत न मिळाल्याच्या कारणावरून रालोआतून बाहेर पडणो तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा मिळेल म्हणून आम्ही भाजपाला साथ दिली.मात्र, भाजपाने हे आश्वासन पाळले नाही.त्यामुळे आमच्या पदरात काहीच न पाडता निवडणुकीत विनाकारण 15 जागा गमवाव्या लागल्या, अशी टीका चंद्राबाबू यांनी केली आहे.

आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आम्ही भाजपशी युती केली. ही युती राजकीय फायद्यासाठी नव्हे तर विकासासाठी होती. तेव्हा आम्ही युती न करता स्वतंत्रपणे लढलो असतो तर टीडीपीला आणखी 15 जागा सहज मिळाल्या असत्या. विशेष राज्याचा दर्जा देतो, असे सांगून भाजपाने आमची अक्षरशः फसवणूक केल्याचे चंद्राबाबू यांची टीडीपीच्या 37 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात सांगितले.