|Sunday, July 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वाजपेयींच्या निधनाची सोशल मीडियावर अफवा

वाजपेयींच्या निधनाची सोशल मीडियावर अफवा 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी सकाळपासून सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. बऱयाच जणांनी त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. मात्र, काही वेळाने सत्यासत्यता पडताळल्यानंतर सदर वृत्तात काहीही तथ्य नसून ती केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. वाजपेयी यांच्या निधनाच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. तसेच खात्री केल्याशिवाय अशाप्रकारचे संदेश पसरवले जाऊ नयेत, असेही भाजपच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

वाजपेयी यांच्या निधनाबाबत यापूर्वीही काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या. 2015 मध्ये ओडिशाच्या बालासोर जिल्हय़ामध्ये एका मुख्याध्यापकांनी शाळेत वाजपेयींच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली होती. श्रद्धांजलीनंतर शाळेला सुटीही देण्यात आली होती. आताही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाजपेयींच्या निधनाचे वृत्त व्हायरल केल्याचा प्रकार उघड झाला आहे.