|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » भारतातील पहिल्या महिला डॉक्टरला गुगलची मानवंदना

भारतातील पहिल्या महिला डॉक्टरला गुगलची मानवंदना 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन समाजव्यवस्थेच्या स्त्रीविषयक गैरसमजुतींना छेद देत आपले कर्तृत्व सिद्ध करणारे नाव म्हणजे डॉ. आनंदीबाई जोशी. भारताच्या याच पहिल्या महिला डॉक्टरला त्यांच्या 153व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडलद्वारे अभिवादन केले .

’कोल्हापुरच्या अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात महिलांच्या वॉर्डसाठी डॉक्टर म्हणून रूजू होण्यासाठी 1886 मध्ये एक तरुण महिला डॉक्टर अमेरिकेहून भारतात परतली. ती तरुणी भारतातील केवळ पहिली महिला डॉक्टरच नव्हती, तर वयाच्या अवघ्या 19 व्या वषी वैद्यकीय पदवी मिळवणारी डॉक्टर होती. तिचे नाव होते आनंदी गोपाळ जोशी. तिची कथा धाडस,जिद्द आणि चिकाटीची गाथा आहे. ’ असं म्हणत गुगलनं त्यांना आदरांजली वाहिली.