|Monday, July 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » स्त्रीशक्ती तीन रुपं दाखवणारं कुंकू, टिकली आणि टॅटू

स्त्रीशक्ती तीन रुपं दाखवणारं कुंकू, टिकली आणि टॅटू 

नियमांची चौकट, परंपरांचं ओझं एका स्त्राrवर थोपवलेलं असतं.  हे नियम तिच्याच घरच्यांनी, आपल्याच समाजाने लादलेलं असते. यामुळं तिचं संपूर्ण आयुष्यच ती जबाबदारी पार पाडण्यात जातं. परंतु, हे चित्र आता बदलत आहे. सध्याची स्त्राr तशी राहिलेली नाही तिला स्वत:ची मतं आहेत, विचार आहेत. परंतु, स्त्रियांनी त्यांचे विचार मांडणे यालाच बऱयाचदा विरोध केला जातो. विशेषत: स्त्राr वर्गाचाच याला विरोध झालेला जास्त करून दिसून येतो. जेव्हा आजच्या काळातील मुलगी आपले विचार मांडते तेव्हा तिला बंडखोर समजले जाते…. अशाच परस्परविरोधी विचारसरणीतील द्वंद्व या कथासूत्रावर आधारित आणि युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे 2 एप्रिलपासून सोम ते शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी वाहिनीवर.

या मालिकेमध्ये गुरुराज अवधानी, विष्णूपंत कुलकर्णी ही भूमिका साकारणार असून, सारिका निलाटकर-नवाथे विभा कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. यांच्यासोबत निवोदित भाग्यश्री न्हालवे, आदिश वैद्य, श्वेता पेंडसे, अमोल बावडेकर, राजेश देशपांडे, राजश्री निकम प्रमुख भूमिकेत असणार आहेत. विभा कुलकर्णी हे पुण्यातलं मोठं प्रस्थ आहे… बाईनं बाई सारखं वागावं… आपल्या मर्यादेत रहावं! अशी त्यांची भूमिका आहे. घरातील सुनाही विभाच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यांनी आखून दिलेल्या चौकटीतच जगत आहेत. हे घर अत्यंत पारंपरिक पण प्रसंगी कर्मठ आहे. वडील, भाऊ, नवरा यांना समाधानात आणि सुखात ठेवण्याची जबाबदारी घरच्या स्त्राrवर आहे अशा विचारांवर उभं आहे. अशा घरामध्ये रमासारखी बिनधास्त, आताच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी सून म्हणून येते. रमाला बास्केटबॉल खेळायला आवडतो, विभक्त कुटुंबातून आल्यामुळे रमाच्या मनामध्ये समस्त पुरुष जातीबद्दल आणि कुटुंब व्यवस्थेबद्दल नाराजी आहे. तिचे स्त्राr स्वातंत्र्याबद्दल ठाम मत आहेत. आणि जेव्हा विभा आणि रमा या परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या स्त्रिया एकमेकांसमोर येतील तेव्हा घराचे घरपण, कौटुंबिक जिव्हाळा, एकमेकांबद्दलचे प्रेम या दोघी कशा टिकवून ठेवतील? रमा आणि विभा कसा समतोल साधतील? कुलकर्णी परिवार आणि विभा रमाला स्वीकारू शकतील का? रमाची आधुनिक विचारसरणी आणि कुलकर्णींचा परंपरावाद यांच्यात मेळ बसेल का? हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.

रमा आणि विभा या परस्परविरोधी विचारसरणीमुळे कुलकर्णींच्या घरात संघर्षाची ठिणगी पेटते. परंपरा चुकीच्या नाहीत पण त्या परंपरेतच स्वत:चे पाय अडकवून घेण्यापेक्षा त्या परंपरांना आपलसं करून पुढे उज्ज्वल प्रवास करणे महत्वाचे आहे हे मालिकेत दाखविण्यात आले आहे. विरेंद्र प्रधान यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.