|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » दिनुच्या सासूबाई राधाबाई नाटक पुन्हा रंगभूमीवर…

दिनुच्या सासूबाई राधाबाई नाटक पुन्हा रंगभूमीवर… 

मराठी रंगभूमीवरील फार्ससम्राट बबन प्रभू यांचे गेली चार दशके गाजत असलेले ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे नाटक आता पुन्हा रंगभूमीवर आले आहे. विनोदाचा बादशहा संतोष पवार या नाटकाचे दिग्दर्शन करत आहे. जुने ते सोने म्हणत हे नाटक रंगभूमीवर आले श्री विश्वस्मै प्रॉडक्शन आणि वेद प्रॉडक्शन्स यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, अभिनेता विनय येडेकर आणि दिग्दर्शक संतोष पवार हे विनोदाचे तीन बादशहा या नाटकाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. नयना आपटे आणि विनय येडेकर हे कलावंतही या नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर एकत्र काम करणार आहेत. तसेच आतापर्यंत अनेक नाटकांतून भूमिका केलेले विनय येडेकर हे पहिल्यांदाच संतोष पवार यांच्या दिग्दर्शनाखाली नाटकात काम करत आहेत. या कलाकारांसह स्वत: संतोष पवार या नाटकात दिनू नाडकर्णी ही भूमिका साकारत आहेत. डॉ. नाथ यांच्या भूमिकेत अभिनेते विनय येडेकर आहेत. नाटय़कर्मी विलास देसाई यांच्यासह इरावती लागू, रोनक शिंदे, वैभवी देऊलकर-धुरी, ऋतुंधरा माने, दीपश्री कवळे हे नव्या दमाचे कलावंतही या नाटकात भूमिका रंगवित आहेत. नाटकाचे नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचे आहे. पार्श्वसंगीत साई पियुष यांचे तर शीर्षक गीत आणि संगीत डॉ. अभिनय देसाई यांचे आहे.