|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूर तापले, पारा 41 अंशावर

सोलापूर तापले, पारा 41 अंशावर 

प्रतिनिधी/ सोलापूर

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून पारा 40 अंश सेल्सीअसच्या खाली नसल्याने सोलापूर तापल्याचे दिसत आहे. रविवारी पारा चक्क 41 अंश सेल्सीअसवर गेला.

  मागील आठवडय़ापासून प्रकर्षाने जाणवणाऱया उन्हाळयामुळे आता पारा वाढत असल्याचे दिसत आहे. दररोज पारा हा चाळीशीच्या वर जात आहे. यामुळे   दरवर्षी उन्हाळयाच्या झळा सोसणाऱया सोलापूरकरांना दुपारच्या सत्रात बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. गर्दीने वाहणारा रस्ता उन्हामुळे सुना वाटत आहे. सकाळी 9 पासून उन्हाची तीव्रता चालू होऊन सायंकाळचे पाच वाजले तरी उन्हाच्या झळा जाणवतच असल्याचे चित्र सध्या आहे.

  सोलापूरकरांना उन्हाळा तसा नवा नाही, मात्र वाढत्या उन्हामुळे उकाडाही खूप वाढला आहे.