|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » शिवरायांबद्दल आक्षेपार्ह शब्द बोलणारा श्रीपाद छिंदम 15 दिवसांसाठी तडीपार

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह शब्द बोलणारा श्रीपाद छिंदम 15 दिवसांसाठी तडीपार 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरणारा भाजपाचा माजी महापौर श्रीपाद छिंदमला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले आहे.

छिंदम याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे. छिंदमला महाराष्ट्रातून बाहेर करा, या मागणीसाठी उद्या सकाळी 11 वाजता अहमदनगरमध्ये विविध पक्षाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पाश्वभूमीवर छिंदमला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले आहे.

 

Related posts: