|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्ग आंदोलनात भाजपची सेनेवर कुरघोडी

दोडामार्ग आंदोलनात भाजपची सेनेवर कुरघोडी 

सर्वपक्षीय आंदोलनात राजकीय पक्षांची श्रेयासाठी धडपड

आरोग्यमंत्री, पालकमंत्री आंदोलनस्थळी आल्याने नाराजी

जिल्हय़ाच्या आरोग्यचा प्रश्न सोडविण्यास दोडामार्गवासीयांचा पुढाकार

युवानारीशक्तीचा सिंहाचा वाटा

लवू परब / दोडामार्ग:

सिंधुदुर्गातील रुग्णांना गोव्यात मोफत उपचार मिळण्यासोबत अन्य मागण्यांसंदर्भात दोडामार्गातील जनआक्रोश समितीने छेडलेल्या आंदोलनाचा शेवट गोड झाला. या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन सिंधुदुर्ग भाजपने पद्धतशीरपणेहायजॅककरत शिवसेनेला आंदोलन मागे घेण्याच्या अंतिम तारीखलासुद्धा पद्धशीरपणे बाजूला ठेवल्याचे पहावयास मिळाले. संपूर्ण आंदोलनात शिवसेनेवर कुरघोडी करण्यास भाजपला पूर्णतः यश आले आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यास भाजपची भूमिका महत्वाची असली तरी दोडामार्गातील युवा नारीशक्तीच्या संघर्षामुळे एकोप्यामुळेच प्रश्न सुटण्यास मदत झाल्याची भावना सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.

दोडामार्ग तालुक्यासोबत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रुग्णांना गोव्यात मोफत उपचार सुविधा मिळण्यासोबत आरोग्य विषयक मागण्यासंदर्भात शासनाने लक्ष वेधण्यासाठी दोडामार्गमधील जनआक्रोश समितीने 20 मार्चपासून येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. आंदोलनाला तालुक्यातील जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. आंदोलनाला उपस्थिती लक्षणिय असल्याचा मॅसेज मिळताच आमदार नीतेश राणे यांनी त्याचदिवशी सायंकाळी उपोषणस्थळी भेट दिली. गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत या संदर्भात सरकारने लक्ष वेधण्याचे स्पष्ट करत प्रत्यक्षात कार्यवाही सुद्धा केली. त्यानंतर हळुहळू शिवसेनेने आपले लक्ष या आंदोलनाकडे केंद्रीत केल्याचे पहायला मिळाले. आमदार राणे दोडामार्गातून बाहेर पडताच शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी दोडामार्गात आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकासमवेत शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु पहिला दिवस असल्याने ठोस आश्वासनाशिवाय आंदोलकांनी श्री. धुरी यांना माघारी पाठवले. तर त्यापूर्वी आंदोलन सुरू होण्याच्या 1-2 दिवस अगोदर सुद्धा पालकमंत्री दीपक केसरकर यांचीही शिष्टाई असफल ठरली होती. तरीही शिवसेनेची या आंदोलनावर नजर होती. कारण आंदोलनामध्ये अवघ्या काही महिन्यापूर्वी थेट निवडून आलेले शिवसेनेचे सरपंच तसेच काही पदाधिकारी देखील होते. आंदोलनाच्या धामधुमीत शिवसेनेला नेमका सूर गवसत नव्हता. तरीही खासदार विनायक राऊत तसेच गोवा शासनाला दोन कोटी रु. देऊ केल्याचे पालकमंत्री केसरकर यांचे पत्र आदांद्वारे शिवसेना आंदोलनस्थळी होती. याच दरम्यान या जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुकाप्रमुख धुरी त्यांच्या पदाधिकाऱयांनी आंदोलनाच्या सातव्या दिवशी दोडामार्ग बाजारपेठेत खडी, वाळूचे डंपर अडविले. रास्तारोकोचा प्रयत्न करत गोव्यातील बसेस तसेच तिलारीचे पाणी अडविण्याचा इशारा दिला. अन् इथेच सिंधुदुर्गदोडामार्ग भाजपची खरी एन्ट्री झाली. शिवसेनेच्या या डंपर अडवा आंदोलनाची तिलारीचे पाणी रोखण्याच्या इशाऱयाची दखल घेऊन भाजपने सुरुवातीला शिवसेनेच्या रास्तारोकोवर जोरदार टीका करत आंदोलन स्थळावर लक्ष केंद्रीत केले. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, नगरसेवक चेतन चव्हाण आदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे धाव घेतली. येथून भाजपने शिवसेनला थोपवत आंदोलन हायजॅक करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या विधानसभेतील निवेदनाचा हवाला देत शिवसेनेने आपल्याकडे आरोग्याची शिष्टाई येईल का ? याची चाचपणी सुरू केली होती. पण वेळ निघून गेली होती. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोव्याचे आरोग्यमंत्री यांच्या भेटीमुळे सर्वांचे लक्ष मुंबई गोव्याकडे लागले होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस गोव्याचे आरोग्यमंत्री श्री. राणे या दोन महिन्यातच मंत्रिमहोदयाच्या गाठीभेटी होऊन 48 तास उलटत नाहीत तोच भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. जठार माजी आमदार राजन तेली गुरुवारी दुपारी सुरुवातीला आंदोलनस्थळी तेथून गोव्यात गेले. अन् इथूनच शिवसेनेच्या हातून आंदोलन निसटले. सिंधुदुर्गातील रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासंदर्भातील गोव्याच्या आरोग्यमंत्र्याचे ते पत्र त्यानंतर जनआक्रोश यांच्यात चर्चा होऊन हे आंदोलन मागे घेण्यात येत असताना शिवसेनेच्या एकही पदाधिकारी, नेता आंदोलनस्थळी उपस्थित नव्हता. या संपूर्ण आंदोलनादरम्यान शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी एकाकी खिंड लढवण्याचे पहावयास मिळाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांची आंदोलनाकडे झालेली पाठ शिवसेनेला अस्वस्थ करुन गेली. एकंदरीत ऐन मोक्याच्या क्षणी एन्ट्री करत सिंधुदुर्गदोडामार्ग भाजपने अगदी आंदोलन मागे घेण्याच्या दिवशी सुद्धा शिवसेनेला पद्धशीरपणे बाजूला ठेवल्याचे दिवसून आले हा चर्चेचाही विषय बनला. गोव्याचे आरोग्यमंत्री श्री. राणे यांचे पत्र भाजप पदाधिकाऱयांच्याच नावे होते.

कधी नव्हे ते जिल्हय़ाचे नेतृत्व दोडामार्गने केले. बांबोळी रुग्णालयात दोडामार्गचे नव्हे तर जिल्हय़ाचे रुग्ण असतात. मात्र, दोडामार्गातून जनजागृती झाली मोठे आंदोलन उभे राहिले. सर्वपक्षीय आंदोलनात राजकीय पक्षांचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ पहायला मिळाली. विशेषतः शिवसेनाभाजपमध्ये जणू स्पर्धाच रंगल्याचे चित्र होते. या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेनेवर कुरघोडी करण्यास भाजपला यश आले आहे. गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनीही भाजप पदाधिकाऱयांच्या नावे पत्र देऊन आरोग्यसेवेची ग्वाही दिली. संपूर्ण आंदोलनाकडे आरोग्यमंत्री पालकमंत्री फिरकल्यामुळे खुद्द दोडामार्गातून नाराजी व्यक्त होत आहे. आगामी काळात या नाराजीचा शिवसेनाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्य मंत्र्यांमुळे शिवसेना बॅकफूटवर

गेले दहा दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तात्काळ दखल घेऊन भेट दिली असती तर कदाचित शिवसेनाला खूप काही करता आले असते. सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या डॉ. सावंत यांनी आंदोलनाला भेट देऊन नजिकच्या गोव्यात जाऊन येथील आरोग्यमंत्री राणे यांच्याशी साधी चर्चा केली असती तरी शिवसेनेवरील आरोग्यमंत्र्याच्या दुर्लक्षाची टीका टळली असती. पण, दुर्दैवाने तसेही घडले नाही. अनेक शिवसैनिकांनी खासगीत आपली खंत उघडपणे बोलूनही दाखवली.