|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » राजस्थान रॉयल्स संघात स्मिथच्या जागी क्लासेन

राजस्थान रॉयल्स संघात स्मिथच्या जागी क्लासेन 

वृत्तसंस्था / जयपूर

7 एप्रिलपासून सुरू होणाऱया 11 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया राजस्थान रॉयल्स संघामध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक हेन्रिच क्लासेनचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत चेंडू कुरतडल्याच्या आरोपावरून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली. या निर्णयामुळे या दोन्ही खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्लासेनचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्सने क्लासेनला 50 लाख रूपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघाचे कर्णधारपद वॉर्नरला या निर्णयामुळे सोडावे लागले आहे. आता वॉर्नरच्या जागी इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सला हैद्राबाद संघात स्थान देण्यात आले आहे.