|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतीचे धरणे आंदोलन

मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतीचे धरणे आंदोलन 

सातारा

: कोयना प्रकल्पग्रस्तांचे पूनर्वसन करुन 60 वर्षे झाली तरीही खातेदारांना भूखंड अथवा पर्यायी जमीन मिळाली नाही. तत्काळ भूखंड व पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात यावे, या विविध मागण्यांसाठी मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाले. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष पार्थ पोळके, चंद्रकांत कांबळे, आनंद कांबळे, सिद्धार्थ कांबळै, नामदेव जगताप, गौरव कांबळे आदी सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मेढा येथील आंबेडकरनगरमधील चाळीत राहणाऱया मागासवर्गीय कोयना धरणग्रस्तांना त्यांच्या मागणीनुसार योग्य त्या ठिकाणी पूनर्वसन करुन अठरा नागरी सुविधा देण्यात याव्यात, सिद्धार्थनगर व भिमनगर (ता. कोरेगाव) येथील प्रकल्पग्रस्त खातेदारांचे ज्या सर्व्हे नं. मधील क्षेत्रात घरांकरता जमीन दिली त्याचा सातबारा तयार करुन देण्यात आलेल्या भूखंडाचा सातबारा सदरी उल्लेख करण्यात यावा, वसना- वंगना योजनेचे पाणी सिद्धार्थनगरला मिळावे, जांब कोरेगाव येथे मातंग समाजासाठी गावठाण मंजूर करावे आदी मागण्या केल्या आहेत.