|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात नोकरी शोधणाऱ्या तरूणाची मित्राच्या घरी आत्महत्या

पुण्यात नोकरी शोधणाऱ्या तरूणाची मित्राच्या घरी आत्महत्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

नोकरी शोधण्यासाठी पुण्यात आलेल्या तरूणाने मित्र भाडय़ाने राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱया 25 वर्षीय तरूणाचे नाव अविनाश वाघमोडे असे आहे.

पुण्यातील राजेंद्रनगरमध्ये पीएमसी कॉलनीत ही दुदैवी घटना घडली आहे. अविनाश तीन-चार दिवसांपूर्वी पुण्यात कामाच्या शोधात आला. तो मित्राच्या रूमवर राहत होता. यात्रा असल्यामुळे त्याचा मित्र गावी गेला होता. दुपारच्या वेळी अविनाशने गळफास घेतला. दिवसभर दरवाजा बंद असल्यामुळे शेजाऱयांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवला आहे.