|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस खासदारांचे संसदेच्या छतावर चढून आंदोलन

काँग्रेस खासदारांचे संसदेच्या छतावर चढून आंदोलन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इराकमध्ये हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी आज पंजाबमधील काँग्रेसच्या खासदरांनी संसदेच्या छतावर चढून आंदोलन केले.

ऍट्रॉसिटी ऍक्ट, कावेरी वाद आणि इराकमध्ये भारतीयांची हत्या आदी मुद्यांवर विरोधकांनी संसदेत गदरोळ केला.यमुळे लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेस खासदारांनी इराकमध्ये मारल्या गेलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. पंजाबमधील काँग्रेसचे तीन खासदार संसदेच्या छतावर चढले आणि हातात फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.