|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भिडेंच्या अटकेसाठी भारिपचे धरणे

भिडेंच्या अटकेसाठी भारिपचे धरणे 

प्रतिनिधी / ओरोस:

 भीमा कोरेगाव येथील 1 जानेवारी 2018 च्या दंगली दरम्यान दाखल करण्यात आलेल्या दलितांवरील गुन्हे मागे घ्यावेत व दंगलीस जबाबदार असणारे संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी भरिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र मणेरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हय़ातील दलित समाज बांधवांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर दगडफेक झाली होती. त्यानंतर उसळलेल्या दंगलीमुळे दलित बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, ही दंगल संभाजी भिडे यांनी घडवून आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

भिमा-कोरेगावच्या दंगलीला जबाबदार असणारे संभाजी भिडे यांना अटक करावी व दलित तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, नुकसान ग्रस्त वाहनांचे पंचनामे करुन त्यांना भरपाई देण्याबाबतचे आदेश व्हावेत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले.