|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चालकाचा ताबा सुटून टँकर पलटी

चालकाचा ताबा सुटून टँकर पलटी 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

औरवाड-गणेशवाडी मार्गावरील गौरवाड फाटय़ाजवळ मळी वाहतूक करणारा टँकर उलटून पडल्याने दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री नंतर घडली. सुदैवाने या टँकरचा चालक आणि क्लिनर बचावले.

या अपघाताची नोंद कुरूंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. टँकर चालक दत्तात्रय बाबूराव जगताप (वय 22, रा. सलगर, ता. मंगळवेढा) व यड्राव (जिल्हा रायबाग) येथे टँकर घेवून औरवाड-गणेशवाडी मार्गे जात असताना गौरवाड फाटय़ाजवळ आले असता समोरून येणाऱया चारचाकी गाडीचे हेडलाईट टँकर चालकाच्या डोळ्यावर पडल्याने टँकरवरील चालकाचा ताबा सुटला व रस्त्यालगत असणाऱया खडय़ात टँकर पलटी झाला.

यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र टँकर मधील मळी सांडून सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. हा रस्ता अरूंद असल्याने या मार्गावरून होणाऱया अवजड वाहतुकीमुळे असे अपघात वारोवार होत आहेत.