|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अब्दूलकरीम खाँ संगीत महोत्सवास 13 एप्रिलला प्रारंभ

अब्दूलकरीम खाँ संगीत महोत्सवास 13 एप्रिलला प्रारंभ 

प्रतिनिधी/ मिरज

मिरासाहेब दर्गा ऊरूसानिमित्त आयोजीत संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ स्मृती संगीत महोत्सवास 13 एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. यंदा उत्सवाचे 84 वे वर्ष आहे. यामध्ये देशभरातील नामांकित गायक-वादक सहभागी होणार आहेत.

 मिरजेतील हजरत ख्वॉजा शमनामिरा दर्ग्याचा ऊरूसानिमित्त दरवर्षी अब्दूलकरीम खाँ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक ऊरूसाच्या दुसऱया दिवशी अब्दूलकरीम खाँ मिरासाहेबांच्या चरणी संगीत सेवा अर्पण करीत. त्यांच्या मृत्यूनंतर शिष्यवृंदाने संगीतमहोत्सव सुरू केला. संगीत महोत्सवाचे यंदाचे 84 वे वर्ष असून शुक्रवारी 13 एप्रिल पासून हा महोत्सव सुरू होत आहे.

  मिरासाहेब उरूसाच्या दुसऱया दिवशी म्हणजे 13 एप्रिल रोजी दर्गा आवारातील चिंचेच्या झाडाखाली सकाळी किराणा घराण्याचे शिष्य संगीतसेवा करणार आहेत. रात्री नऊ वाजता मुख्य संगीतसभेला सुरूवात होणार आहे. यामध्ये सदाशिव मुळे, मिरज यांचे शहनाईवादन, सौरभ काडगावकर, पुणे यांचे गायन, तिलोत्तमा सुर्यवंशी, पुणे यांचे सतारवादन, मंजिरी कर्वे-आलेगावकर, पुणे यांचे गायन, पंडीत नित्त्यानंद हळदीपूरकर, मुंबई यांचे बासरीवादन, पल्लवी पोटे, पुणे यांचे गायन, योगराज नाईक, गोवा यांचे सतारवादन, सृजन राणे, मुंबई यांचे गायन, मोहसीन खान, धारवाड यांचे सतारवादन, जशन भुमकर, मुंबई यांचे गायन होणार आहे.

  14 एप्रिल रोजी पंडित शैलेश भागवत यांच्या शहनाईवादनाने दुसऱया दिवशीच्या संगीत सभेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मीना फातर्फेकर, पुणे यांचे गायन, रफत खान, मुंबई यांचे सतारवादन, गायत्री जोशी, पुणे यांचे गायन, श्रीराम हसबनीस, पुणे यांचे सोलोतबला वादन, सारंग व राजन कुलकर्णी, पुणे यांचे सरोद सहवादन, सुधाकर चव्हाण, पुणे यांचे गायन, प्रकाश हेगडे, बेंगलोर यांचे बासरीवादन, सौ. वृषाली देशमुख, नागपूर यांचे गायन होणार आहे.

  15 एप्रिल रोजी गिरीमल बजंत्री, विजापूर यांचे शहनाईवादन, शुचिता आठलेकर, मुंबई यांचे गायन, उस्ताद रफिक नदाफ, सांगली यांचे सतारवादन, सुश्मिता झा, नवीदिल्ली यांचे गायन, ऐनोद्दीन वारसी, देगलूर यांचे बासरीवादन, संगीता काखंडकी, बेंगलोर यांचे गायन, विजय गोणाहळू, बेंगलोर यांचे सतारवादन, प्रचला अमोणकर, गोवा यांचे गायन, हाफिज खान, बेंगलारे, यांचे सतारवादन, केदार केळकर, पुणे यांचे गायन होणार आहे. तीन दिवस चालणाऱया या महोत्सवात हार्मोनियम साथ पंडीत अनंत केमकर, पंडीत सुधांशु कुलकर्णी, संदीप  तावरे, श्रीराम हसबनीस, सागर कुलकर्णी हे हार्मोनियम साथ तर माधव मोडक, पं. मनमोहन कुंभारे, निशिकांत बडोदेकर, कल्याण देशपांडे, दादा मुळे, खंडाराव मुळे, अजित किंभवणे, प्रदीप कुलकर्णी, अंगद देसाई हे तबला साथ करणार आहेत. दर्गा आवारात दररोज रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत. संगीतरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.