|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बनावट सोने तारणातून लाखोंची लूट?

बनावट सोने तारणातून लाखोंची लूट? 

राष्ट्रीयकृत बँकेतील प्रकार,सोनाराने घातला गंडा

कर्जाबाबतच्या पत्रानंतर ग्राहकांमध्ये खळबळ खोटय़ा सहय़ा घेऊन अनेकांची फसवणूक

वरिष्ठ पातळीवर प्रकरण मिटविण्याच्या वाटाघाटी

वार्ताहर /संगमेश्वर

संगमेश्वर जवळच्या एका राष्ट्रीयकृत बँपेत बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामध्ये सेनाराने काही ग्राहकांच्या स्वाक्षऱया घेऊन कर्जाची रक्कम लाटल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत संबधीत ग्राहकांना कर्जाबाबतची पत्र आल्यानंतर त्यांच्यात खळबळ उडाली आहे. या प्रकाराबाबत अद्याप तक्रार दाखल झालेली नसून प्रकरण मिटवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

काही दिवसापूर्वी संगमेश्वर जवळपास एका राष्ट्रीयकृत बँकेत वॉचमनच्या हातात असलेल्या बंदूकीतून गोळी सुटल्याची चर्चा होती. याप्रकरणी वरिष्ठांनी सीसीटीव्ही पहाणी केल्यानंतर संबंधित वॉचमनला समज देवून सोडले होते. त्यानंतर जवळच्याच एका बँकेत बनावट सोने तारणाद्वारे लाखोंचा गंडा घातल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या बँकेतील सोने तपासणारा सोनारच यातील महत्वाचा ‘खेळाडू’ असल्याची चर्चा आहे. बँकेने पाठविलेल्या पत्रानंतर आपल्या नावावर कर्ज काढले गेल्याचे अनेक ग्राहकांना समजले आहे. काही खातेदारांना या सोनाराने फसवून सह्या घेवून त्यांना या प्रकरणी गुंतविल्याची चर्चा आहे. या सोनाराबरोबर बँकेच्या अधिकाऱयांचेही संगनमत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रीयकृत बँकेतील हा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱयांनी तातडीने बँकेत धाव घेत याची माहिती घेतली. तसेच याचा बोभाटा होऊ नये यासाठी प्रकरण मिटविण्याबाबतचे प्रयत्य सुरू केल्याचे समजते.

Related posts: