|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मतदार याद्या-अर्ज मराठीतून द्या

मतदार याद्या-अर्ज मराठीतून द्या 

तालुका म. ए. समितीची जिल्हाधिकाऱयांकडे  निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

घटनेने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. पण जिल्हा प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने मतदारांच्या मागणीनुसार कागदपत्रे उपलब्ध करणे गरजेचे आहे. सीमाभागामध्ये 21 टक्क्मयांहून अधिक मराठी भाषिक राहतात. पण त्यांना मराठीतून मतदार याद्या आणि मतदान करण्याचे यंत्र उपलब्ध केले जात नाही. हे घटनाविरोधी असून तातडीने मराठीमध्ये मतदार याद्या आणि उमेदवारी अर्ज उपलब्ध करावेत, अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करत आहे. पण जिल्हा प्रशासन मराठी भाषिकांना जाणून बुजून मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. सीमाभागामध्ये मोठय़ा संख्येने मराठी भाषिक राहतात. त्यांचे सर्व व्यवहार मराठीमध्ये होतात. उच्च न्यायालयाने येथील मराठी भाषिकांना मराठीमध्ये परिपत्रके देण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीसारख्या प्रक्रियेमध्येदेखील दुजाभाव जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अनेकांना इंग्रजी येत नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्मयता

सीमाभागामध्ये कन्नडबरोबर इंग्रजीमधून मतदार याद्या आणि उमेदवारी अर्ज उपलब्ध केल्याचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक अधिकारी सांगत आहेत. पण अनेकांना इंग्रजी येत नसल्यामुळे उमेदवाराचे नाव व चिन्ह समजणे अवघड आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्मयता असून तातडीने मराठीमध्ये मतदार याद्या आणि उमेदवारी अर्ज उपलब्ध करावेत, अशी मागणी निवडणूक अधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.

दोन दिवसांत मतदार याद्या मराठीतून न दिल्यास जनयाचिका दाखल

मतदान करणे हा प्रत्येकाचा घटनेने दिलेला अधिकार आहे. मतदान करताना मतदाराची भूमिका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सीमाभागातील जनतेने मराठीतूनच मतदार याद्या आणि अर्ज द्यावेत, अशी मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत जर मतदार याद्या मराठीत दिल्या नाहीत तर त्या विरोधात जनयाचिका दाखल करु, असा इशाराही तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. याकडे निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकारी लक्ष देणार काय? याबाबत मराठी भाषिकांचे लक्ष लागून आहे. बहुतांश वृद्ध महिला, व्यक्ंितना इंग्रजीचा गंधही नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये चुकीच्या उमेदवाराला मतदान होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. तेव्हा निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष म्हात्रु झंगरुचे, कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, सचिव मनोज पावशे, एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, नगरसेवक मोहन बेळगुंदकर, लक्ष्मण होनगेकर, उपाध्यक्ष भावकाण्णा पाटील, पिराजी मुचंडीकर, अशोक पाटील, राजाराम गुरव, यल्लाप्पा जायाण्णाचे, शिवाजी पट्टण, निवृत्ती डुकरे, किशोर पावशे, पुंडलिक मोरे, चांगाप्पा इंगळे, मारुती कणबरकर, सुरेश आगसगेकर, मारुती पाटील, जोतिबा पाटील, दत्तात्रय शिंदे, संजय पाटील, अजित कडेमनी, विशाल चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.