|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » दौंडमधील पाच गुन्हेगार तडीपार

दौंडमधील पाच गुन्हेगार तडीपार 

ऑनलाईन टीम / दौंड :

दौड येथील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. या गुंडांना पुणे आणि अहमदनगर जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले आहे.

त्यागी रणदिवे, अशोक सोनवणे, अर्जून गायकवाड, नीलेश कदम आणि अमोल ढवळे हे तडीपार केलेले पाच गुन्हेगार आहेत. या पाच जणांवर लुटमार, रेल्वेत लुटमार, जबरी चोरी, मारहाण, इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तडीपार झालेल्यांपैकी त्यागराज रणदिवे हा सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. तर अशोक सोनवणे आणि अमोल ढवळे यांना आज पुणे जिल्हय़ाच्या बाहेर सोडण्यात आले. अर्जून गायकवाड व नीलेश कदम फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे. सहायक फौजदारांसह एक पोलीस हवालदार या कारवाईत भाग घेतला.