|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘गोसासे’चा काव्यसंध्या उद्या

‘गोसासे’चा काव्यसंध्या उद्या 

प्रतिनिधी /पणजी :

गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे आयोजित केली जाणारी मासिक काव्यसंध्या शनिवार 7 रोजी सायंकाळी 5 वा. होणार असून यावेळी काव्यसंध्येच्या अध्यक्ष सुनिता शहा असणार आहेत.

 सुनिता शहा या गोव्यातील प्रसिद्ध कवियत्री असून त्यांचा ‘हा पाऊस नक्षत्राचा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच ‘विद्युल्लता’ हा लेखसंग्रहही प्रकाशित झाला आहे. त्यांचा अनेक कविसंमेलनामध्ये सहभाग असतो तसेच गोव्यातील सर्व वर्तमानपत्रात त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात.

 कवी आणि कविताप्रेमींनी या काव्यसंध्येस मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.