|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा प्रभाग रचनेवर एकूण 62 हरकती

मनपा प्रभाग रचनेवर एकूण 62 हरकती 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर हरकत दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी तब्बल 25 हरकती दाखल झाल्या. यामुळे एकूण 62 हरकती आल्या असून यावर 16 एप्रिलला राज्य निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता यातील दुसरा टप्पा यावर सूचना आणि हरकती दाखल करण्याचा आहे. याची शुक्रवार, 27 मार्च पासून सुरूवात झाली असून, सहा एप्रिलपर्यंत मुदत होती. गुरूवार अखेर 34 हरकती दाखल झाल्या होत्या तर शुक्रवारी शेवटच्या दिवशी 25 हरकती दाखल झाल्या. यामुळे एकूण 62 हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक सांगली 50, कुपवाड आणि मिरज प्रत्येकी 6 हरकतींचा समावेश आहे. या हरकतींवर राज्य निवडणूक आयोगासमोर 16 एप्रिला सुनावणी तर 23 रोजी निर्णय दिला जाणार आहे.

नगरसेवक शेखर माने यांनी चार प्रभागांच्या वेगवेगळय़ा अशा चार हरकती दाखल केल्या. प्रभाग एकमध्ये प्रगणक 17 फोडला. मात्र यामध्ये लोकसंख्येविषयी प्रगणक गटाचे विभाजन करताना ज्या गटाचे विभाजन केले. त्याची सक्षम चौकशी करून लोकसंख्या निश्चित केलेचा तपशील परिशिष्ठ आठमध्ये दाखविणे अवश्यक असताना निरंक शेरा मारला असून चुकीचा प्रारूप नकाशा प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रभाग तेरामध्ये तीन  सदस्य असताना चार दाखविण्यात आले. सरसरी लोकसंख्येपेक्षा कमी दाखविली असून ती चुकीची आहे. प्रभाग एक ते 20 मध्ये प्रभाग रचना नकाशामध्ये प्रगणक गट व परिशिष्ठ क्र तीन मध्ये दर्शविण्यात आलेली माहिती विसंगती आहे. कोणत्या गटाची तिकी लोकसंख्या आहे ते समजून येत नाही यामुळे हे चुकीचे आहे. प्रारूप प्रभाग रचनेत रस्ते, नाले, नद्या, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे दर्शविले नाही, लोकसंख्येचाही उल्लेख करण्यात आला नसल्याने यावर हरकत असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेचे माजी मिरज तालुका उपप्रमुख अनिल माने यांनी हरकत दाखल केली असून लांबलचक प्रभाग रचनेमुळे नागरिकांची कामे होणार नाहीत, प्रभाग रचना ही चौकोनी किंवा आयताकृती असावी, अशी हरकत घेतली आहे. संभाजी सावंत वसंत कॉलनी यांनी प्रभाग रचना व क्रमांक झिगझॅग पध्दतीने नाहीत. उत्तम कांबळे भीमनगर यांनी प्रभाग दहा यांनी आयोगाच्या नियमानुसार संलग्न नाही. शिवछत्रपती कॉलनी प्रभाग 11 आली आहे. रेल्वेलाईन वेगळे होत असताना काही भाग प्रभाग दहा व अकरामध्ये समावेश होत आहे. अमोस मोरे खणभाग यांनी एमआयडीसी भाग, खासगी औदयोगिक वसाहत, वसंतदादा कारखाना, अनेक भागाचा अभ्यास करून मतदार नोंदणी मनपा निवडणुकीतून वगळावी, येथील विकास मुद्दा नगरसेवकांकडे येत नाही.

 नवी प्रभाग रचना विकास कामांवर गदा आणणारी आहे. मुकुंद पटवर्धन यांनी दाखल केलेल्या हरकतीमध्ये प्रभाग रचनेनुसार केलेला सर्व भाग क्र 16 मध्ये जोडला. पण भौगोलिक रचनेनुसार हा परिसर 14 मध्ये जोडणे संयुक्त होणार आहे. हरभट रोड रेवणी रस्ता, त.भा स्टेडीयम हा भाग मनपा रचनेप्रमाणे पेठभागात येतो. पण हा खणभागशी जोडला आहे. कैलास काळे यांनी केलेल्या हरकतीमध्ये पॅनल पध्दत बंद करावी, प्रमोद नलवडे यांनी नवीन प्रभाग 15 चुकीच्या पध्दतीने झाली आहे. शंभरफुटी एमएसईबी सबस्टेशनपासून कुस्ती आराखडा दक्षिणेकडील भाग चुकीच्या पध्दतीने समाविष्ट केला आहे. रामचंद्र जाधव सांगलीवाडी यांनी दाखल केलेल्या हरकतीमध्ये प्रसिध्द नकाशा दिशाभूल करणारा आहे.

 सचिन सरगर, सि.स नं 229 अन्य प्रभागात समावेश केला आहे हा भाग 29 मध्ये समावेश करणे गरजेचे आहे. अशोक माळी यांनी दिलेल्या हरकतीमध्ये शिवछत्रपती कॉलनी, जासुद मळा, रेल्वेस्टेशन पासून कलानगर ते उड्डाणपुल भाग प्रभाग 11 मध्ये समावेश केला असून तो चुकीचा असून तो 10 मध्ये घ्यावा, चवगोंडा देशिंगे यांनी दाखल केलेल्या हरकतीमध्ये प्रभाग 16 ची प्रभाग रचना चुकीची आहे, दीपक सावंत घरापासून ते एसटी स्टॅड रोड राणी सरस्वती शाळा, हिराबाग कॉर्नर, मनवे किराणा स्टोअर पासून वॉटर हाऊस पश्चिम भाग 16 मध्ये तो 15 मध्ये समाविष्ट करावा.

 विभाग निहाय हरकती

सांगली : 50

मिरज : 6

कुपवाड : 6

एकूण : 62