|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शुक्रवारी शहराच्या काही भागात पाऊस

शुक्रवारी शहराच्या काही भागात पाऊस 

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. वळिवाचे जोरदार आगमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र शहराच्या काही भागांमध्येच गेल्या दोन दिवसांपासून वळिवाने हजेरी लावली आहे तर काही भागांमध्ये मात्र हुलकावणी दिली आहे. शुक्रवारी टिळकवाडी, वडगाव, अनगोळ परिसरात पुन्हा पाऊस झाला. मात्र त्या तुलनेत शहराच्या इतर भागामध्ये  पावसाचा केवळ शिडकावाच झाला.

शुक्रवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये वाढ झाली होती. त्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. गारांसह काही भागामध्ये पाऊस सुरू झाला. या पावसामुळे बऱयाच जणांची तारांबळ उडाली. फिरते तसेच भाजी विपेते आणि दुचाकीस्वारांना पावसामुळे आडोसा शोधावा लागला. पण केवळ अर्धातास पडून त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.

दक्षिण भागात केवळ शिडकावा

शहराच्या दक्षिण भागामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा शिडकावा होत आहे. मात्र उत्तर भागामध्ये पाऊसच पडत नाही. केवळ उष्म्यामुळे साऱयांच्याच अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पण वळीव रोजच हुलकावणी देऊ लागला आहे.