|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » कॉमनवेल्थ गेम्स : भारताच्या खात्यात तिसरे सुवर्णपदक

कॉमनवेल्थ गेम्स : भारताच्या खात्यात तिसरे सुवर्णपदक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताचा स्टार वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगमने 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिसऱया दिवशी आणखी एक सुवर्णपदक भारताला मिळवून दिले आहे. सतीशने पुरूषांच्या 77 किलो वजनीगटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

सतीशने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. सतीशने स्नॅचमध्ये 144 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये उचललं 173 किलो वजन उचललं. 25 वषीय सतीशने 2014 मधील ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं होतं.ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतले हे पाचवे पदक ठरले आहे. विशेष म्हणजे ही पाचही पदकं वेटलिफ्टर्सनीच पटकावली आहेत. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे.पहिल्या दिवशी वेटलिफ्टर गुरुराजाने रौप्यपदकाची कमाई करत भारताचं पदकांचं खातं उघडले, तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्ण कमावून पहिलं गोल्ड मेडल मिळवण्याचा मान पटकावला.