|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » क्रिडा » CWG 2018ः भारताच्या पदरात अजून एक सुवर्णपदक

CWG 2018ः भारताच्या पदरात अजून एक सुवर्णपदक 

ऑनलाईन टीम /

कॉमन वेल्थ गेमच्या तिसऱया दिवशी भारतीय वेटलिफ्टर्सनी भारतासाठी पदके मिळवण्याची प्रक्रिया कायम ठेवत सकाळी सतिश कुमार शिवलिंगमने भारतासाठी 77 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले आहे.

टेबल टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या खेळांमध्येही भारतीय संघाने चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱया बाजूला जलतरणपटू सजन प्रकाशने 200 मी. बटरफ्लाय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, अंतिम फेरीत त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. याव्यतिरीक्त सायकलिंग, बास्केटबॉल या खेळांमध्येही भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

यानंतर शेवटच्या मेडल इव्हेंटमध्ये 85 किलो वजनी गटात भारताच्या वेंकट राहुल रगालाने भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवले. अखेरच्या क्षणापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करत राहुलने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आतापर्यंत भारताच्या खात्यात 4 सुवर्णपदके जमा झालेली आहेत. सध्या पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

 

Related posts: