|Thursday, June 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजपच्या दलित खासदाराचे पंतप्रधानांना पत्र

भाजपच्या दलित खासदाराचे पंतप्रधानांना पत्र 

लखनौ

उत्तरप्रदेशात भाजपच्या दलित खासदारांची पक्षाबद्दलची नाराजी वाढत चालली आहे. आता नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. यशवंत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेले पत्र समोर आले आहे. न्यायालयात आमच्या समाजाचे कोणतेही प्रतिनिधित्व नसल्याने आमच्या विरोधात नवनवे निर्णय देऊन दलितांचे अधिकार संपवित असल्याचा दावा सिंग यांनी पत्रात केला आहे. काही दिवसांपूर्वी रॉबर्ट्सगंजचे खासदार छोटेलाल खरवार आणि इटाव्याचे खासदार अशोक दोहरे यांनी देखील मोदींना पत्र लिहिले होते. त्यांनी ऍट्रॉसिटी कायद्यात बदल आणि दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. दलितांसाठी आरक्षण विधेयक संमत करविण्याची मागणी यशवंत सिंग यांनी केली. बढतीत आरक्षणासाठी विधेयक संमत करविण्याची विनंती केली होती. संघटनेचे लोक देखील हेच इच्छितात, परंतु सरकार स्थापन होऊन 4 वर्षे उलटून गेली तरीही या देशात सुमारे 30 कोटी दलितांसाठी कोणतेही विधेयक सादर झालेले नसल्याचे सिंग यांनी म्हटले. सद्यकाळात भाजपचे दलित खासदार देखील समाजाच्या शोषणाचे शिकार ठरले आहेत.