|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार,चुलत भाऊ ताब्यात

साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार,चुलत भाऊ ताब्यात 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील देहुरोड येथे घरा शेजारी राहणाऱया साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी एका 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलगा हा मुलीचा चुलत भाऊ असल्याचे समजले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देहू रोड इथे शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. तक्रारीनुसार, संबंधित मुलगी तिच्या घरासमोर खेळत असताना, नववीत शिकणाऱया आरोपी मुलाने तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी संबंधित मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी मुलगा तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर तिची आई मुलाच्या घरात गेली. पण आईला पाहिल्यानंतर मुलाने तिथून पळ काढला, अशी माहिती देहू रोड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱयांनी दिली. मुलीच्या आईने संबंधित प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर शनिवारी त्यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाविरोधात भारतीय दंड विधान कलम 376 (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोदविला आहे.