|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » पीएनबी घोटाळय़ाने गमाविली केवळ 3 दिवसांची कमाई

पीएनबी घोटाळय़ाने गमाविली केवळ 3 दिवसांची कमाई 

बीएसईचे सीईओ चौहान यांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था/ मुंबई

पंजाब नॅशनल बँकेमधील कर्ज घोटाळय़ाने भारतीय बँक क्षेत्र संकटात सापडल्याचे अफवा पसरविण्यात आली आहे. भारतील बँकिंग क्षेत्र हे मजबूत आहे आणि नीरव मोदी प्रकरणी बँकांनी गमाविलेली रक्कम ही केवळ तीन दिवसांतील व्याजातून मिळणाऱया रक्कमेएवढी असल्याचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशिष चौहान यांनी म्हटले.

हिऱयांचा व्यापारी नीरव मोदी, त्याचा मामा मेहुल चोक्सी आणि त्यांच्या कंपन्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेतून बनावट एलओयूच्या आधारे बँकांतून 13 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा घोटाळा केला. या प्रकरणी न्यायालयीन कारवाई सुरू आहे. भारतीय बँकिंग क्षेत्र मजबूत आणि उत्तम प्रकारे कार्यरत आहे. 1992 मध्ये हर्षद मेहता बँक घोटाळय़ानंतर भारतीय बँकिंग व्यवस्था आणि रिझर्व्ह बँकेकडून योग्य त्या सुधारणा करण्यात आल्या असत्या तर हा घोटाळा टाळता आला असता असे चौहान यांनी अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये बोलताना म्हटले.

1992 मध्ये बँकांना प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते. नोटाबंदी, जीएसटी आणि आता बँक घोटाळय़ांमुळे शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. भारतीय बँकिंग क्षेत्र एक कोटी कोटी रुपयांचे आहे. भारतातील बँका कर्ज घेणाऱयांकडून 12 टक्के दराने व्याज वसूल करतात आणि सामान्य खातेधारक जे बँकांत पैसे जमा करतात त्यांना 4 टक्के व्याज देतात. याप्रकारे बँका आपला लाभ कमवितात असे त्यांनी म्हटले.

या प्रकारे एक कोटी कोटी रुपयांवर 12 टक्के दराने 12 लाख कोटी रुपये बँका कमवितात आणि महिन्याला सामान्य खातेधारकांना केवळ 1 लाख कोटी रुपये देण्यात येतात. तीन दिवसांत बँका 10 हजार कोटी रुपये कमवितात आणि ही रक्कम तीन दिवसांच्या व्याजाएवढी आहे असे त्यांनी स्पष्ट केले.