|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आधी जेवण ; मग उपोषण !

आधी जेवण ; मग उपोषण ! 

उपोषणापूर्वी काँग्रेस नेत्यांच्या ‘पोटपुजे’चे फोटो व्हायरल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलनाआधीच दिल्लीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी ‘पोटपुजे’चे फोटो व्हायरल झाल्याने या आंदोलनाची भाजपने खिल्ली उडवली. दरम्यान, लाक्षणिक आंदोलन ही सुरूवात होती. यापुढे भाजप सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र केला जाईल, असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

दलितांवरील वाढत्या अन्यायाविरोधात सोमवारी दिल्लीतील राजघाटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एक दिवस लाक्षणिक उपोषण आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र या आंदोलनापूर्वी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन, अरविंद सिंह लवली, हारून युसूफ यांच्यासह अन्य काही नेते छोले भटुरेचा अस्वाद घेत असल्याचा फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला. 

                                उपोषण केवळ फार्स : भाजप

भाजप नेते हरीश खुराणा यांनी काँग्रेस नेत्यांचे फोटो टिवटर्च्या माध्यमातून सर्वत्र पोहचवले. तसेच देशातील जनतेला काँग्रेसचे नेते मुर्ख बनवत असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर आंदोलन केले. अहिंसेची भाषा केले. या आंदोलनात शीख दंगलीतील आरोपी सज्जन कुमार व जगदीश टायलर यांची उपस्थिती होती. काँग्रेसच्या लाक्षणिक उपोषण आंदोलन केवळ फार्स होते, असा आरोप भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केला.

                          आमचे उपोषण प्रतिकात्मक

 समाजमाध्यमावर व्हायरल झालेले फोटो हे सकाळी आठ वाजताचे आहेत. उपोषणाची वेळ सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 अशी होती. हे बेमुदत उपोषण नव्हते. आमचे उपोषण प्रतिकात्मच होते, असा खुलासा काँग्रेसचे नेते अरविंदरसिंग लवली यांनी केला. सकाळी अकारच्या आधी न्याहरी घेणे गुन्हा आहे का, असा सवाल करत अजय माकन यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले.

                           राजघाटवर राहुल गांधींचे उपोषण

राजघाटवर राहुल गांधी यांनी सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. केंद्र सरकारकडून दलितविरोधी भूमिका घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित विरोधी आहेत. भाजपचे धोरणच अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासींविरोधात आहे. 2019मधील लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्त्वाखालील रालोआचा आम्ही पराभव करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, मल्लिकार्जून खर्गे, शीला दीक्षित, अशोक गेहलोत, राजदीप सुरजेवाला, अजय माकन आदी उपस्थित होते.

Related posts: