|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अक्कलकोट स्वामी समर्थ मठात गोमंतकीय बालकलाकारांची कीर्तने

अक्कलकोट स्वामी समर्थ मठात गोमंतकीय बालकलाकारांची कीर्तने 

प्रतिनिधी/ पणजी

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज मठात धर्म संकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात बुधवार 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता फोंडा येथील गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालयाच्या बाल कीर्तनकारांचा चक्री कीर्तन कार्यक्रम होणार आहे.

या चक्री कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार सुहासबुवा वझे यांच्या शिष्य ह.भ.प. शिवानी वझे, ह.भ.प. रमा शेणवी, ह.भ.प. दिव्या मावजेकर कीर्तन सादर करणार आहेत.

आतापर्यंत शिवानी वझे, रमा शेणवी, दिव्या मावजेकर या कीर्तनकारांनी राज्यात अनेक ठिकाणी सुश्राव्य कीर्तनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. महाराष्ट्रातही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. अक्कलकोट येथे त्यांना कीर्तन कार्यक्रम सादर करण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले आहे, असे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान धर्मकीर्तन उत्सव समितीचे कार्यक्रम संयोजक डॉ. हेरंबराव पाठक यांनी कळविले आहे.