|Friday, January 18, 2019
You are here: Home » Automobiles » रोज 2जीबी डेटा एअरटेलची ऑफर

रोज 2जीबी डेटा एअरटेलची ऑफर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. 499 रूपयांच्या रिचार्जमध्ये रोज 2जीबी इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. हा रिचार्ज पॅक 82 दिवसांसाठी असणार आहे. एअरटेलच्या ग्राहकांनी 499 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना लोकल आणि एसटीडी कॉल, मोफत रोमिंग, दररोज 100 एसएमएस, दररोज 2जीबी इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच संपूर्ण प्लानचा विचार करता 82 दिवसात तुम्हाला 164जीबी डेटा (4जी/3जी) मिळेल.

 

याआधी जिओने 251 रुपयांचा खास आयपीएल पॅक, तर बीएसएनएलने 248 रुपयांचा पॅक ऑफर केला आहे. त्यामुळे आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या या प्लानसोबत एअरटेलची स्पर्धा असेल. आयपीएल सुरु असल्याने एअरटेलच्या क्रिकेटप्रेमी ग्राहकांना या ऑफरचा फायदा होईल, हे मात्र नक्की.

 

 

 

 

 

Related posts: