|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मनपा विरोधात राष्ट्रवादी युवकचे लाक्षणीक उपोषण

मनपा विरोधात राष्ट्रवादी युवकचे लाक्षणीक उपोषण 

प्रतिनिधी/ मिरज

शहरातील विविध समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौकात एक †िदवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल पवार, संजय बजाज, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, साजिद पठाण, बाळासाहेब होनमोरे, आप्पासाहेब हुळ्ळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱयांनी उपोषणस्थळी भेट दिली. युवकचे शहराध्यक्ष शरद सातपूते, कार्याध्यक्ष असलम बाडवाले यांनी या उपोषणाचे आयोजन केले होते.

शहरात विविध समस्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सातत्याने निवेदन देऊनही त्याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली केली असल्याने या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक दिवसाच्या लाक्षणीक उपोषणाचे आयोजन केले होते. या उपोषणात राहूल पवार यांच्यासह शरद सातपूते, असलम बाडवाले यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तर संजय बजाज, बाळासाहेब होनमोरे, सचिन जगदाळे, राजू गोसावी, आप्पासाहेब हुळ्ळे, रविंद्र कदम, महावीर खोत, समीर कुपवाडे, योगेंद्र थोरात, संदीप व्हनमाने, कैस शेख, गोगा बागवान, मोहसीन सय्यद, विष्णू माने, तनजीन नान्नीवाले, शहाबाज कुरणे, सन्मान हेर्लेकर, बाळासाहेब भंडारे, अब्दूल शेख, शहराध्यक्ष साजिद पठाण, वंदना चंदनशीवे, ज्ञानेश्वर पाटील, तुषार खांडेकर अशा अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी घटनास्थळी हजर राहून उपोषणाला पाठींबा दिला.

शहरातील मोकाट कुत्री आणि जनावरांचा बंदोबस्त करावा, स्वच्छतेबाबत ठोस निर्णय घ्यावेत, शिवाजी क्रीडांगणाच्या दुरूस्तीबाबत ठोस उपाययोजना करावी, बऱयाच वर्षांपासून प्रलंबित असलेला भाजी मंडईचा प्रश्न मार्गी लावावा, ऐतिहासिक लक्ष्मी मार्केटची इमारत दुरूस्त करावी, शहरात सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्याबरोबर पार्किंगची व्यवस्था करावी, निकृष्ठ दर्जाच्या रस्ते कामाची चौकशी व्हावी, नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, शहरात वाढत असलेले अतिक्रमण थोपवावे अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी आयुक्तांना देण्यात आले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Related posts: