|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चौथ्या दिवशी वीस उमेदवारी अर्ज

चौथ्या दिवशी वीस उमेदवारी अर्ज 

फोंडा पालिका निवडणूक : काँग्रेस पॅनलमधून बारा अर्ज

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा पालिकेसाठी येत्या 29 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी तब्बल वीस उमेदवारांनी अर्ज सादर केले. फोंडय़ाचे आमदार रवी नाईक व काँग्रेस पुरस्कृत फोंडा नागरिक प्रागतिक मंचच्या बारा उमेदवारांचा त्यात समावेश आहे. याशिवाय भाजपातर्फे एक, स्वाभिमानी फोंडेकर पॅनलतर्फे दोन अर्ज भरण्यात आले. अर्ज भरण्यासाठी सकाळी 11 वा. पासून उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. उशिरा आलेल्या एक दोन उमेदवारांना वेळ संपल्याने माघारी परतावे लागले.

काँग्रेस पुरस्कृत फोंडा नागरिक प्रागतिक मंचतर्फे प्रभाग 2 मधून रुपक देसाई, प्रभाग 3 मधून मिंगेल फर्नांडिस, प्रभाग 5 मधून विद्यमान नगरसेविका लालन सत्यवान नाईक, प्रभाग 6 मधून विलीयम आगियार, प्रभाग 7 मधून माजी उपनगराध्यक्ष दिक्षा दिलीप नाईक, प्रभाग 8 मधून विदेश विठ्ठल नाईक, प्रभाग 9 मधून बेला रॉड्रिगीस, प्रभाग 10 मधून रसिक पारकर, प्रभाग 12 मधून मेलिंडा कुलासो, प्रभाग 13 मधून विदिता विवेक प्रभू, प्रभाग 14 मधून आनंद पी. नाईक, प्रभाग 15 मधून माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

स्वाभिमानी फोंडेकरतर्फे प्रभाग 5 मधून मनोज गावकर तर प्रभाग 14 मधून रुद्रेश पारोडकर यांनी अर्ज भरले. भाजपातर्फे प्रभाग 8 मधून प्रितम प्रकाश नाईक यांनी एकमेव अर्ज सादर केला.

याशिवाय माजी कवळे जिल्हा पंचायत सदस्य तथा बोरीच्या माजी सरपंच शैला बोरकर यांनी प्रभाग 4 मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रभाग 4 मधून एकिता लालेश नाईक, प्रभाग 8 मधून सुदेश गणपत नाईक, प्रभाग 10 मधून माजी नगरसेवक महादेव खानोलकर, प्रभाग 12 मधून शुभांगी बाबनी कवळेकर या उमेदवारांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 13 एप्रिलपर्यंत असल्याने अजून बरेच उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे. काल चौथ्या दिवसापासून उमेदवारांची संख्या वाढू लागल्याने उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विशाल कुंडईकर यांनी सर्व उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. फोंडा नागरिक प्रागतिक मंच पॅनलचे पंधरा पैकी चौदा उमेदवार आमदार रवी नाईक यांनी जाहीर केले असून उर्वरित दोन उमेदवार आज बुधवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आमदार रवी नाईक यांचे पूत्र रितेश नाईक हे प्रभाग 11 मधून तर चंद्रीका चंद्रकांत नाईक या प्रभाग 1 मधून उमेदवारी भरणार आहेत. प्रभाग 4 मधील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.  आजपर्यंत गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण 29 उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. मगो पक्ष पुरस्कृत पॅनलचे चार उमेदवार आज अर्ज भरण्याची शक्यता आहे.