|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » नगर शिवसैनिकांची हत्या प्रकरण : कर्डिले यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

नगर शिवसैनिकांची हत्या प्रकरण : कर्डिले यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या तोडफोडी प्रकरणी भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कर्डिले हे सोमवारी सकाळी कॅम्प पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले, त्यानंतर न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यांनतर त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणात पोलिसांनी त्यांना भादवि 308 कलम वाढवल्याने कर्डिले यांना जमीन मिळू शकला नाही. कर्डिलेसह अन्य 22 जणांची पोलीस कोठडी देखील संपली.

काय आहे प्रकरण ?

केडगाव येथे दोन शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणात भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली. सत्ताधारी आमदाराला त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. हत्येप्रकरणी या पुर्वी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना आटक करण्यात आली होती. कर्डिले हे आमदार जगताप यांचे सासरे आहेत. कर्डिले यांच्यावर हत्येचा कट रचणे व पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्डिले यांची अटक केवळ तोडफोड प्रकरणाशी संबंधित असून त्याचा हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. दोन शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱयांची हत्या झाल्यानंतर आमदार शिवाजी कार्डिले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह 250 ते 300 कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे केडगाव पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 22 जणांना काल अटक करण्यात आली होती. इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आज शिवाजी कार्डिले यांना आधी ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली

 

Related posts: