|Sunday, June 16, 2019
You are here: Home » उद्योग » 2019-20 ला जीडीपी 7.6टक्के होण्याचा अंदाज

2019-20 ला जीडीपी 7.6टक्के होण्याचा अंदाज 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील आर्थिक दर सन 2019-2020 पर्यत 7.6 टक्के पोहचण्यांचा अंदाज अशियन डेव्हलपमेन्ट बँकेने दिलेल्या अहवालातून समजते. नोटाबंदी नोव्हेबर 2016 ला करण्यात आली होती.व जीएसटी कर लागु करण्यात आला होता यात मागील आर्थिक वर्षात 6.6 टक्के आर्थिक वाढीचा दर होता तर चालू वर्षात हा दर 7.3 टक्के आहे. पण हि सर्व परिस्थीती बदलून लवकरच आर्थिकदर स्थिरावणार असल्यांचे ही सांगण्यात येत आहे.

देशात उद्योग व्यवसाय ,शेती व्यापार यांचा विस्कटलेली व्यवहाराची घडी येत्या काळात स्थिर होऊन आपण जीएसटी व नोटाबंदी याच्या परीणामातून संथ चालू असलेले व्यवहार आता गती घेणार आसून याचा फायदा भविष्यात दिसून येणार आहे. खाजगी उद्योगाची कामगिरी चांगली क्षेप घेणार असल्याची चिन्हे आहेत.याबरोबर शेती क्षेत्रातील बाजार भाव समाधानकारक मिळत गेल्यास थोडय़ा थेडय़ा कालावधी च्या बदलाने जीडीपी वाढण्यास सुरु होऊन 2019-20 पर्यत 7.6टक्के पोहचण्याचा अंदाज आहे.