|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » भाजपच्या लाक्षणिक उपोषणात सँडविच, वेफर्स फस्त

भाजपच्या लाक्षणिक उपोषणात सँडविच, वेफर्स फस्त 

 पुणे/ प्रतिनिधी :

एकदिवसीय उपोषणाआधी छोले-भटुरेवर ताव मारणाऱया काँग्रेस नेत्यांवर सडकून टीकास्त्र सोडणाऱया भाजपाला त्यांच्याच आमदारांनी आता अडचणीत आणले आहे. गुरुवारी पुण्यातील उपोषणात सहभागी झालेले दोन आमदार प्रशासकीय बैठकीत सँडविच, वेफर्स खातानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने या आमदारांवर टीका होत आहे.

 विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज वाया गेल्याच्या निषेधार्थ देशभरात भाजपाचे सर्व खासदार आणि पदाधिकारी गुरुवारी लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. पुण्यात देखील खासदार अनिल शिरोळेंसह शहर व ग्रामीण भागातील भाजपाचे पदाधिकारी लाक्षणिक उपोषणास बसले. या उपोषणस्थळी आमदार बाळा भेगडे आणि आमदार भीमराव तापकीर हे देखील काही वेळ उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी विधानभवन येथे पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम, जलयुक्त शिवार योजनेच्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीच्या वेळी सँडविच, वेफर्स आणि बर्फीची प्लेट सर्वांना देण्यात आली. त्यावेळी बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी प्लेटमधील सर्व पदार्थ फस्त केले. याचा व्हिडीओ काही मिनिटांत सर्वत्र व्हायरल झाला. .

 

 

Related posts: