|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » रियल माद्रीद उपांत्य फेरीत

रियल माद्रीद उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ माद्रीद

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डोने दुखापतीच्या कालावधीत पेनल्टीवर नोंदविलेल्या गोलाच्या आधारे रियल माद्रीदने ज्युवेटस्चा सरासरी 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. रोनाल्डोने हा निर्णायक गोल 98 व्या मिनिटाला नोंदविला.

या स्पर्धेतील यापूर्वीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात ज्युवेंटस्ने रियल माद्रीदचा 3-1 असा पराभव केला होता पण त्यानंतर रियल माद्रीदने सरासरी 4-3 असा ज्युवेंटस्वर विजय नेंदवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले.