|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » असिफाच्या बलत्कारामागे पाकचा हात : भाजप प्रदेशाध्यक्ष

असिफाच्या बलत्कारामागे पाकचा हात : भाजप प्रदेशाध्यक्ष 

ऑनलाईन टीम / भोपाळ :
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय चिमुकल्या असिफावर बलात्कार करून, तिची हत्या केली गेली. या हत्येचा निषेध करण्याऐवजी भाजप नेते नंदकुमार सिंह चौहान यांनी या घटनेमागे पाकिस्तानाचा हात असल्याचा आरोप केला आहे. नंदकुमार सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

हिंदुस्थानी मुलीवरील बलात्कारानंतर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या जातात म्हणजे नक्कीच पाकिस्तानी एजंटकडून देशात भेद निर्माण करण्यासाठी ते हे करत आहेत, अशी शंकाही नंदकुमार सिंह यांनी व्यक्त केली.“काश्मिरात हिंदूंची संख्या एक टक्केही नाही. जे काही हिंदू आहेत, ते आधीपासूनच असहाय आहेत आणि आपलं तोंडही उघडू शकत नाहीत, ते ‘जय श्री राम’च्या घोषणा कशा देऊ शकतात? त्यामुळे काश्मिरात जे काही सुरु आहे, ते पाकिस्तानी एजंट करत आहेत.’’, असे नंदकुमार सिंह म्हणाले.नंदकुमार सिंह हे भाजपचे मध्यप्रदेशचे अध्यक्ष असून, खंडवा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. भाजपमधील ज्ये÷ आणि वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

 

 

Related posts: