|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आवळी खुर्द येथे मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न

आवळी खुर्द येथे मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न 

वार्ताहर/ आवळी बुदुक

आवळी खुर्द ता. राधानगरी येथे ग्रामपंचायतीच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीरात सुमारे 60 रूग्णांची तपासणी करण्यात आली. 

शिबीराचे उद्घाटन सरपंच सौ. नंदिनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी युवा नेते विजय पाटील, संजय पाटील, सुभाष हुंदळकर, सुनिल कुंभार, यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. रूग्णांची तपासणी डॉ. सौ. सुमेधा सामानगडकर (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली आरती कदम, संजय पाटील, पूनम पाटील, सविता तेली यांनी केली. तपासणी झालेल्या रूग्णांना माफक दरात चष्मा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आभार ग्रामसेवक साताप्पा पाटील यांनी मानले.

 

Related posts: