पंतप्रधान मोदींकडून आंबेडकर स्मारकाचे उद्घाटन
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतूनच साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. हे स्मारक दिल्लीतील लोककल्याण मार्ग स्थानकाच्यानजीक आहे. या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य, त्यांच्या आठवणी आणि पुस्तके तसेच त्यांच्याशी संबंधित अनेक वस्तू यांचा संग्रह करण्यात आला असून अभ्यासकांसाठी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या स्मारकाची रूपरेषा तयार केली होती. या स्मारकाचे उद्घाटन करण्यापूर्वी मोदींनी दिल्लीच्या मेट्रोतून प्रवास करत मेट्रो प्रवाशांशी संवाद साधला.
Related posts:
Posted in: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय