|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » त.शेटफळमध्ये नदीत बुडून बालिकेचा मृत्यू

त.शेटफळमध्ये नदीत बुडून बालिकेचा मृत्यू 

तपकिरी शेटफळ/ वार्ताहर

तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील माण नदीमध्ये बुडून इंद्रायणी वसंत कांबळे (वय 8) या बालिकेचा मृत्यू झाला आहे. तर तिच्यासोबत असणा-या तिच्या प्रगती व रोहिणी या दोन बहिणींना वाचविण्यात यश आले आहे.

याबाबत हकिकत अशी की, सकाळी तपकिरी शेटफळ येथील माण नदीमध्ये  धुणं धुण्यासाठी मयत इंद्रायणी वसंत कांबळे, प्रगती वसंत कांबळे आणि रोहिणी वसंत कांबळे गेल्या हात्या. कपडे धुतल्यानंतर या तिघी बहिणी अंघोळीसाठी नदीमध्ये उतरल्या होत्या. नदीमधील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तिघी बहिणी नदीमध्ये बुडाल्या. मुली पाण्यामध्ये बुडाल्याचे नदीवर उपस्थित असणाऱयांना समजल्यावर लोकांनी मुलींना बाहेर काढण्यासाठी नदीमध्ये उडया घेतल्या.

यामध्ये गावातीलच सुशिला धर्मा माने या महिलेने त्यातील दोन बहिणींना वाचविण्यात यश आले. तर इंद्रायणी कांबळेचा पाण्यामध्येच बुडुन मृत्यु झाला. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून या  घटनेची नोंद तालुका पोलीस स्टेशमध्ये करण्यात आली आहे.

Related posts: