|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » भाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत

भाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर बोलत होते. तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले. त्यावर खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले.बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेलं एकंदरीत वातावरण हे भ्रमनिरास करणारं असल्याचं सांगत; त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, जिथे पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, ती पदं आपण स्वीकारणार नसल्याचं सांगत त्यांनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला

 

 

 

 

 

 

 

 

Related posts: