|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या

सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या 

ऑनलाईन टीम / सुरत :

कठुआ, उन्नाव येथील घटना ताजी असतानाच आता गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर तब्बल 8 दिवस बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर आरोपीकडून मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

सूरतमध्येही एका 11 वषीय मुलीवर बलात्कार आणि हत्येची घटना घडली. पीडित मुलीवर तब्बल 8 दिवस अत्याचार करुन, नराधमानी तिची निर्घृण हत्या केली आहे. सूरतमधल्या पांडेसरा भागात एका क्रिकेट ग्राऊंडजवळ या चिमुकलीचा मृतदेह आढळला होता. या घटनेतल्या आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठत मुलीला प्रचंड यातना दिल्याचं तिच्या मृतदेहावरुन लक्षात येत आहे. कारण या 8 वर्षाच्या मुलीच्या अंगावर 87 जखमांच्या खुणा आढळून आल्याचं समजतं आहे. पण अजूनही या मुलीची ओळख मात्र पटलेली नाही