|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » शिकारीमध्ये मृण्मयी देशपांडेची वेगळी भूमिका

शिकारीमध्ये मृण्मयी देशपांडेची वेगळी भूमिका 

‘शिकारी’ या मराठी चित्रपटाची रसिकांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर चर्चा आणि उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या अनेक वैशिष्टय़ांबरोबरच आणखी एक म्हणजे या चित्रपटाचे सरप्राईज पॅकेज मफण्मयी देशपांडे जी या चित्रपटांत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  मफण्मयीच्या आजवर गाजलेल्या भूमिका या खूप सोज्वळ, शहरी स्वरुपाच्या होत्या. ती चतुरस्त्र अभिनेत्री आहे हे तिने वारंवार सिद्ध केलंय. मी तिला शिकारी सिनेमातील भूमिका सांगताना तिच्या होकाराबद्दल थोडा साशंक होतो. कारण खूप काही बुद्धीजीवी भूमिका पडद्यावर जिवंत केल्यानंतर एका तशा अर्थाने सामान्यबुद्धी आणि उनाड मुलीची भूमिका करण्याची डेअरिंग करण खूप जिकिरीचे होते. शिवाय कलाकार म्हणून आव्हानात्मकसुद्धा आहे. पण तिने जितक्या सकारात्मक दृष्टीने या भूमिकेकडे पाहिलं ते पाहून मला वाटलं की ती अभिनेत्री म्हणून समफद्ध होत असतानाच प्रगल्भ होतेय. अमुक एक भूमिका त्यासाठी अमुक एक देहबोली, भाषा, उच्चार पुन्हा त्यातली सहजता. सगळं जमवून आणणं ही खरंच तारेवरची कसरत होती. पण, तिला वफत्तीनेच साचेबद्ध काम करणं पसंत नसल्याने तिने खरंच या भूमिकेत सुद्धा जीव ओतला आहे, असे  चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी मृण्मयीच्या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे भरभरुन कौतुक केले.

  एकीकडे उनाड अवखळ अदांनी धमाल उडवलीय तर दुसरीकडे शफंगारिक प्रसंग साकारताना पातळी घसरु न देता मादक दिसणं काय असतं हे सुद्धा दाखवून दिलं. चित्रपटसफष्टीला लाभलेल्या गुणी अभिनेत्री जेव्हा मनोरंजनप्रधान सिनेमात आपलं नाणं वाजवून दाखवतात तेव्हा त्यांना सिनेमाच्या पडद्यावर पाहणं हा एक अनुभव असतो आणि तो मफण्मयी या सिनेमात नक्कीच देते, असे शिकारी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले.

  शिकारीमध्ये काम करताना करताना मला मजा आली. आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. माझी जी वेगळी इमेज आहे त्यापेक्षा या रोलमध्ये वेगळेपण होते म्हणून मी हा रोल निवडला, असे मफण्मयी देशपांडे हिने सांगितले. ती पुढे म्हणाली की, महेश मांजरेकर आणि विजू माने यांच्यामुळेच मी या चित्रपटात आले. महेश मांजरेकर यांनी मला जेव्हा या रोलविषयी विचारलं तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकले नाही. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे तर तेवढीच महत्वाची भूमिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम सुव्रत जोशीने यात साकारली आहे. त्यांच्याबरोबर भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे, वैभव मांगले, कश्मीरा शाह,  प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर दुर्गेश बडवे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहे. महेश मांजरेकर यांनी ‘शिकारी’चे सादरीकरण केले आहे. आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.